पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना निवडणूक लढविणार नाही

आपलाच निर्णय फिरवला
मुंबई: पश्चिम बंगालसह ५ राज्यात निवडणुका होत आहे. त्यातील पश्चिम बंगालवर सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने याबाबत अधिकृत भूमिका मांडली आहे. शिवसेना पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक लढविणार नसल्याचे घोषित केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली. जानेवारी महिन्यात निवडणुका लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.यावेळी त्यांनी आपल्याच निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे.
संजय राऊत म्हणाले, पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना काय भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ममता दीदी सोबत उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
पश्चिम बंगाल मधील लढाई ममता दीदी विरोधात दिसत आहे. ममता बनर्जी विरोधात ‘एम’ हा म्हणजे मसल, मनी आणि मिडीयाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे शिवसेना ममता बनर्जी सोबत उभी आहे. आणि ममता दीदी निवडून याव्यात यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगत ममता दीदी ही खरी बंगालची वाघ असल्याचे त्यांनी ट्वीट मध्ये केले आहे.
जानेवारी महिन्यात संजय राऊत यांनी शिवसेना पश्चिम बंगाल मध्ये उभी राहणार असल्याचे घोषित केले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चे नंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले होते. मात्र आता या राऊत यांनी युटर्न घेतला असून पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.