Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाशिवसेना कॉंग्रेस मध्ये विलीन करा

शिवसेना कॉंग्रेस मध्ये विलीन करा

भाजपचे आमदार नितेश राणे यांची टिका   

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल यांच्या अभिभाषणावर केलेल्या हल्ल्यानंतर विरोधक पेटून उठले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्यावर टिका केली होती. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करून टिका केली आहे. त्यात त्यांनी शिवसेना कॉंग्रेस मध्ये सामील करून घेण्याची ही योग्य वेळ आली आहे अशी टिका केली.

शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे कालचे सभागृहातील भाषण पाहता असे वाटते की, अधिकृतपणे शिवसेना पक्ष कॉंग्रेस मध्ये विलीन करायची योग्य वेळी आली आहे अशी टिका आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सभागृहातील भाषणात दिल्लीतील शेतकरी आंदोलन, सावरकर, अभिजात मराठी भाषा, कोरोनाची रुग्णसंख्या, औरंगाबाद नामकरण आदी विषयावरून विरोधकांवर हल्ला चढविला होता.

“आज एक कॉमेडी सम्राट विधानसभेत पाहिला आणि ऐकला… महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही

कुणी मुख्यमंत्री देता का” अशीही टिका नितेश राणे यांनी केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments