|

हाफकिन वरून शिवसेना – मनसेत श्रेयवादाची लढाई

Shiv Sena-MNS battle of credentials from Halfkin
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राज्यात लसी अभावी अनेक केंद्र बंद करण्यात आले आहेत. यावरून केंद्र – राज्य सरकार मध्ये राजकारण चांगलेच रंगले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरण पूर्ण करता यावे यासाठी हाफकिनला लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकार कडून केंद्राकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. यावरून आता शिवसेना – मनसे मध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.
काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिनला लस उत्पादन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिनला भेट देऊन लस निर्मितीला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. २ दिवसापूर्वी हाफकिनला लस निर्मितीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यानंतर आता शिवसेना – मनसेत श्रेयवादावरून लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट करून राज ठाकरे नाव मागणी केल्यानेच हाफकिन लस निर्मितीची परवानगी मिळाली असा दावा केला.

काह आहे संदीप यांचे ट्विट
राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.करोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती. अस आपल्या ट्विट म्हटले आहे.

संदीप देशपांडे यांच्या ट्विट नंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यानी केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे. यांनीही पत्र व्यवहार महाराष्ट्र आणि मुंबईसाठी चांगले झाले आहे. पण राज ठाकरे यांच्या पत्र व्यवहार नंतर हाफकिनला लस निर्मितीला परवानगी दिली हे म्हणणं बालिश पणाच आहे. पंतप्रधानाच्या कामाचा व्याप पाहता राज्याचा प्रस्ताव पाहता राज्याचा प्रस्ताव पाहता गेला तेव्हा ते कदाचित शक्य झालं नसेलन पण राज्याच्या काळजीपोटी सगळ्यांची प्रयत्न केले. त्याचा एकत्रित परिमाण दिसला. याचा श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही अस किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवानीशी बोलताना सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *