Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचामेंढपाळ व भटक्या विमुक्तांना आधारकार्ड नाही म्हणुन लसीकरणापासुन वंचित ठेवू नका.

मेंढपाळ व भटक्या विमुक्तांना आधारकार्ड नाही म्हणुन लसीकरणापासुन वंचित ठेवू नका.

मुंबई : महाराष्ट्रासहित देश व जगभरामध्ये कोरोना विषाणुच्या आजाराने थैमान घातले असून. सर्वच जनजीवन ठप्प झालेले आहे. अशा जीवघेण्या आजारा विरोधात महाराष्ट्र राज्य सक्षमपणे लढत आहे. अश्यावेळी सध्या सर्वात प्रभावी उपाय या आजारावर लसीकरण हेच आहे. दरम्यान १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या लसीकरणापासून राज्यातील मेंढपाळ-भटक्या विमुक्त जाती जमाती वंचित राहू नाही यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेंढपाळ पुत्र आर्मीच्या वतीने निवदेन देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे की, लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी आधार क्रमांक किंवा तत्सम दस्ताऐवज सुद्धा गरजेचा आहे. मात्र अश्यावेळी राज्यातील मेंढपाळ-भटके विमुक्त जाती जमाती या प्रामुख्याने सतत स्थलांतरण करणाऱ्या आहेत. तसेच या जाती जमातीं मध्ये शिक्षणाचा व तंत्रज्ञान जागृतीचा अभाव ही असून हे लोक केवळ या काराणामुळे लसीकरणापासून वंचित राहू शकतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर म्हणजेच ग्रापंचायत मार्फत अधीवसाची कुठलीही अट न ठेवता ऑफलाईन नोंदणी केंद्रे चालू करावी. तसेच ऑनलाईन नोदणी केंद्र चालू करण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास सरपंच अथवा संबंधित आरोग्य अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या प्रमाणपत्रावर लसीकरण नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. अशी विनंती मेंढपाळ पुत्र आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments