शरद पवार यांचा प्रस्ताव फेटाळला
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब मुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर चिखल फेक करण्यात येत आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देशमुख यांनी बार, हॉटेल आदी कडून १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा सांगितले. यानंतर भाजपने हा प्रश्न लावून धरला आहे. अनिल देशमुख यानी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
यानंतर होणाऱ्या टिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्यांकडून करून घ्यावी असा प्रस्ताव पवार यांनी मांडला होता.
यावर रिबेरो यांनी आपण उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. आता पर्यंत मला सरकारने संपर्क केलेला नाही. कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीसाठी जरी त्यांनी माझ्या संपर्क केला तर मी उपलब्ध नसले असे उत्तर देत त्यांनी शरद पवार यांच्या प्रस्ताव फेटाळून लावला .
आता मी ९२ वर्षाचा आहे. या वयात कोणीही अशा प्रकरणाचा तपास करणार नाही. जर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची चौकशी लागली तर शरद पवार यांचीच करावी असे रिबेरो यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाच का करायला सांगता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.