|

शरद पवार यांचे फोन टॅप होत होते

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली: महाविकास आघाडीचे सरकार बनत असतांना गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना संपर्क केला होता. त्या आमदारांना ठाकरे सरकार मध्ये सामील होऊ नये असे सांगण्यात आले. तुमच्या फायली तयार आहे. अशा प्रकारचा इशारा, धमकी देण्यात आली होती असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

दिल्लीत पत्रकारांशी संजय राऊत बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले,  शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्याबरोबर इतर आमदारांना भाजपला साथ द्या यासाठी पोलीस खात्याकडून धमक्या देण्यात येत होत्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर पुढील ५ महिने रश्मी शुक्ला या त्याच पदावर राहिल्या याच मला आश्चर्य वाटत. राजकाणात प्रशासनावर एवढा विश्वास ठेवून चालत नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रशासनातील तीन-चार अधिकारी भाजपला मदत करत आहेत हे आमच्या लक्षात आले होते. शरद पवारांना सुद्धा ही बाब लक्षात आली होती. सरकार तयार होत असतांना असे अधिकारी जवळ बाळगू नये असे लक्षात आले होते. ही कारवाई वेळीच झाली असती तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला यायची संधी मिळाली नसती. यातून राज्यकर्ते शहाणपणा घेतील. त्यांना बाजूला काढायला वेळ का लागला हे मी सांगू शकत नसल्याचे सांगत, कदाचित त्या अधिकाऱ्यांना एक संधी दिली असेल. असेही राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतांना माझ्यासह, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन टॅप होत होता. केंद्र सरकार कडून अजूनही फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. अस्तीनितल्या सापांना वेळीच बाजूला काढण गरजेच. सरकारला अंधारात ठेवून फोन टॅपिंग करण्यात आले. केंद्र सरकार सगळ्यांचे फोन करत आहेत. नेते, मंत्र्यांनी सगळ्यांनी सतर्क राहायला हवे. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अधिकाऱ्यांच्या खांद्यावर किती काळ बंदूक ठेवणार. सरकार मधील सगळ्यांना यांचे गांभीर्य असायला हवे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *