सह्याद्रीतील ‘या’ वनस्पतीला शरद पवारांचे नाव

sharad-pawars-name-for-the-ya-plant-of-sahyadri
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पती शास्त्रज्ञांनी सह्याद्री पर्वत रांगेत आढळून आलेल्या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नाव दिले आहे. या नव्या वनस्पतीला ‘अर्जेरीया शरदचंद्रजी ‘ असे नाव देण्यात आले आहे. शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदाना बद्दल हे समर्पण असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

गारवेल कुळातील ही वनस्पती असून डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्षे या कुळातील वनस्पतीचे संशोधन करत असून ते या बाबतीत जगविख्यात आहेत. याआधी त्यांनी आतापर्यंत पाच नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तसेच या संशोधनाला जगभर मान्यता मिळाली आहे. त्याचप्रमाणे, या वनस्पतीच्या संशोधनाची माहिती कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या ‘रीडीया’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

या वनस्पतीचा प्रथम शोध २०१६ साली लागला. तसेच, सह्याद्री पर्वताच्या ‘आलमप्रभू  देवराई’त ही वनस्पती आढळून आली आहे. या वनस्पतीवर तीन वर्षे संशोधन केल्यावर जगाच्या कोणत्याही भागात अश्याप्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण असलेले वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण शोधाला नाव देण्याचा अधिकार मिळतो. या प्रक्रीये दरम्यान जगभरातील वनस्पतीतज्ञ या संशोधनाचा सर्वकष अभ्यास करुन सुचवलेले नाव हे अंतिम करतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान ग्रंथातून हे संशोधन प्रकाशित होते व संबंधित वनस्पतीला संशोधकाने सुचवलेले नाव बहाल करण्यात येते. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्या नंतर आता शरद पवार यांना समर्पित केलेल्या ‘अर्जेरीया शरदचंद्रजी’ या वनस्पतीला नामांकरण करण्यात आले आहे. या वनस्पतीचे संशोधन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे अध्यक्ष के. जी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस आर. यादव यांचे सहकार्य लाभले आहे.

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट च्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ विनोद शिंपले व डॉ प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल.या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते.” असे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार व्यक्त केले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *