|

‘त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका’ शरद पवार यांनी भाजपला फटकारत महाविकास आघाडीला दिला कानमंत्र

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. सरकारच्या प्रत्येक धोरणावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

काही घटक हे नाराज होतील. आरोप करत बसतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. लोकांच्या कामाला वेग द्या, धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा असा कानमंत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

मुंबईतील सिद्धार्थनगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज हस्ते शुभारंभ झाला. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे.

ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे उपक्रम घेण्याचे शक्य आहे तिथे नक्की हे उपक्रम घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊन नका, धाडसाने निर्णय घ्या आणि कामाला सुरुवात करा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राची जनता कायम तुमच्या पाठीमागे उभी राहिली आहे असं शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

घर ही लहान गोष्ट नाहीय, निवास हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बीडीडी चाळीचा विषय मुंबईसाठी खूप महत्त्वाचा होता. त्याचे अनेक वेळा भूमिपूजन झाले आहे. पण निर्णय काही झाली नव्हता. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी जबाबदारी हातात घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन काम आता मार्गी लावले आहे, असे म्हणत शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचे कौतुक केले आहे.

आपले रक्षण करणारा पोलीस कर्मचारी हा राज्याचा मुख्य घटक आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा घराचे प्रश्न आधी मार्गी लागले पाहिजे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचे क्वार्टर हे चांगले नाही. पोलीस कर्मचारी 16-16 तास काम करतात मात्र त्यांना चांगला निवारा नाही.

त्यामुळे पोलिसांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली आहे.

ताज्या बातम्या –

राज्य सरकाराने ऊस दराच्या एफआरपी संदर्भात काढलेल्या आदेशावरुन शेट्टी पाठोपाठ खोतही आक्रमक

कोठड्या तयार आहेत, पळता भुई थोडी होईल, त्यातून हे सरकार पडेल – चंद्रकांत पाटील


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *