शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नाशिक :  शरद पवार यांनी युपीएच नेतृत्व कराव. आता पर्यंत युपीएच नेतृत्व कॉंग्रसने केल. देशात विरीधी पक्षाची आघाडी मजबूत व्हायची असेल, जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष युपीएत यावं असं वाटत असेल तर त्याच नेतृत्व शरद पवार यांनी करावं. यापूर्वी सोनिया गांधी यांनी युपीएच नेतृत्व केले होते विरोधी. मात्र त्या आता राजकारणात सक्रीय नाहीत. अनेक प्रादेशिक पक्ष NDA आणि युपीएमध्ये नाहीत. त्यांना भाजपच्या विरोधात काम करायचं आहे. त्यामुळे शरद पवार सक्षम आहेत असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

नाशिक येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सचिन वाझे आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक आढळल्या प्रकरणात ते बोलत होते.  NIA ला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयए  काय तपास करायचा आहे ते करू द्या. आम्ही कुठल्याही तपासासाठी तयार आहोत. तपास करण्यात मुंबईचे पोलीस दल सक्षम आहे. केंद्रातील सरकार राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज्यसरकारला काहीही अडचण येणार नाही.

भाजपचे नेते हाय कमांडला मुजरा करायला गेले असतील

भाजपचे दिल्लीत हाय कमांड आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते त्यांना मुजरा करायला गेले असतील. त्यामुळे यात काही नवीन नाही. उद्धव ठाकरे हे जर पंतप्रधान झाले तर आम्ही पण दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेवू. कॉंग्रेसचे नेतेही दिल्लीला जाऊन हाय कमांड समोर मुजरे करत होते.  

जळगाव मध्ये घोडाबाजार, मग पहाटेचा काय गाढवबाजार होता का?

संजय राऊत यांनी जळगाव महापालिकेत झालेल्या निवडणुकी बद्दल भाजप कडून टिका करण्यात येत आले. त्याला संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिल. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेन घोडाबाजार केला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यावर “घोडेबाजाराचा आरोप कुणी कुणावर करावा? भाजपन याआधी घोडेबाजार केला नाही का? पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार का? असा उलट प्रश्न राऊत यांनी केला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *