|

शरद पवारांना डिस्चार्ज; बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढ

Sharad Pawar discharged; Increased security around the bungalow
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि १५ दिवसानंतर जर त्याचे शरीर चांगले साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर दुसरी शस्त्रक्रिया केली जाणार आहे असं नवाब मलिक म्हणालेत.

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. आपल्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आणि शरद पवार यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

शरद पवार यांना गेल्या मंगळवारी पोटदुखीचा त्रास जाणवू  लागला आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे.

डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *