वाझेंना परत घेऊ नका असं शरद पवार, संजय राऊत यांना सांगितलं होतं.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेले वाहन ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हे NIA च्या कोठडीत आहे. सचिव वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेतल्यावरून वाद निर्माण झाले आहे. सचिन वाझे यांचे कॅरेक्टर खराब आहे. त्याला पुन्हा सेवेत घेऊ नये अस मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितलं होत. पण माझ कोणीही ऐकल नाही. राज्य सरकारने ही मोठी चूक केल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेले वाहन आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्यसुत्रधार सचिन वाझे असल्याचे समोर आले आहे. वाझेना पुन्हा सेवेत घेतल्याने ठाकरे सरकारवर टिका करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा टिका केली होती. यासगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सुद्धा सचिन वाझे प्रकरणावरून टिका केली आहे.
ख्वाजा युनुस प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहेत. त्यांच्यावर खटला सुरु आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घ्यायला नको होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे हे समजल्यावर मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्याकडे गेलो होतो. त्याला सेवेत घेऊ नये अस सांगितले होते. पण परमबीर सिंह यांनी काही तरी वेगळा सल्ला सरकारला दिला असावा. तो सल्ला ऐकून वाझेना परत घेण्यात आले. ही सर्वात मोठी चूक होती. असही अबू आझमी म्हणाले.