|

त्रास होत असल्याने शरद पवार निर्धारित वेळेआधीच रुग्णालयात दाखल

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उद्या एडोस्कॉपी आणि शत्रक्रिया होणार होती. पण त्यांना त्रास होत असल्याने आजच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली. शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना आजच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली होती.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्टेटसच्या माध्यमातून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. बाबांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं लिहित, त्यांच्या प्रकृतीबाबतची दैनंदिन माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक देतील असंही त्यांनी स्टेटसच्या माध्यमातून सांगितलं.

पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याच सांगण्यात आले होते. पवार यांचं दुखणं वाढल्यामुळं निर्धारित वेळेआधीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती नवाब मालिकांनी ट्विट करून दिली आहे.

शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात असल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, श्री शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *