सीरमचे अदर पुनावाला यांचा मोठा खुलासा, …म्हणाले बड्या राजकीय हस्तींकडून धमक्या, मी सत्य बोललो तर…

लंडन : कोरोना लसीचे उत्पादन करणारी भारतातील व जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी आज धक्कादायक खूलासा केला आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल अशी भीती सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये सुद्धा लस उत्पादन देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वेळेत आश्वासन पाळण्यात अडचण येत असल्याच्या कारणाने सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाने हे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे अदर पुनावाला यांनी सांगितले आहे. केंद्रिय गृहमंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वीच वाय दर्ज्याची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.
‘The Times’याबाबत वृत्त दिले असून यामध्ये आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या राजकीय हस्तींकडून त्यांना जीवे मारणाच्या धमक्या येत आहेत. त्यांना सतत धमक्यांचे फोन कॉल येत असून फोन कॉल सर्वात वाईट गोष्ट आहे. सारखे येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक असल्याचे अदर पुनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येत आहेत. त्यामुळे सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहे. अशी चर्चा सुरु आहे. कोरोना लसीचे उत्पादन सध्या पुण्यातून चालू आहे.