सिरमची लस अमेरिकेत, इंग्लडमध्ये स्वस्त; तर भारतातच महाग

मुंबई : देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने लसीचे दर घोषित केले असून खासगी रुग्णालयांना ६०० रुपयात देण्याचे ठरविले आहे. मात्र इतर देशांशी तुलना केली असता हे दर सर्वाधिक महाग असल्याचे समोर येत आहे.
सिरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड आणि एस्त्र्झेंकाच्या मदतीने कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लस बनविली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावला यांनी एका मुलाखतीत सांगितले की कोवीशिल्डच्या प्रती वायलला केवळ १५० रुपये नफा मिळतो.
१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ५० टक्के साठा थेट कंपनी कडून विकत घेता येणार आहे. त्यानंतर सिरमने दर ठरवून दिले आहेत. राज्य सरकारला ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांमध्ये ६०० रुपये असे दर ठरवून दिले होते. तर केंद्र सरकला १५० रुपयांना लस देण्यात येत आहे.
इतर देशात कोविशील्डचे दर
सौदी अरेबिया – ३९५
साऊथ आफ्रिका – ३९५
अमेरिका – ३००
बांगलादेश – ३००
ब्राझील – २३७
इंग्लंड – २२६
याचबरोबर युरोपियन देशामध्ये ही लस १६२ ते २६४ रुपये इतकी आहे.