Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचासोलापूर मधील ‘या’ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस

सोलापूर मधील ‘या’ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस

पुणे: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या राज्यातील १३ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस पाठविण्यात आली आहे. यातील ७ कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे.

राज्यातील १३ कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ५५६ कोटी रक्कम थकविली आहे. महसुली कायद्या प्रमाणे या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

सोलपुर जिल्ह्यातील हे आहेत साखर कारखाने

विठ्ठल सहकारी कारखान्याने ३९ कोटी रुपये ७६ लाख, गोकुळ कारखाना २१ कोटी ६ लाख, सिद्धनाथ ७२ कोटी ९६ लाख,  कांठेश्वर ४५ कोटी २९ लाख, विठ्ठल रिफायनरी ६१ कोटी ८१ लाख, जय हिंद साखर कारखाना ६१ कोटी ८१ लाख, लोकमंगलम अग्रो ३१ कोटी ३९ लाख, लोकमंगलम इथोनॉल भांडार कवठे ७७ कोटी ६८ लाख, लोकमंगलम माऊली धाराशिव ७० कोटी २४ लाखांची या सोलपुर जिल्ह्यातील हे आहेत साखर कारखाने शेतकऱ्यांची एफआरपी थकविली आहे. या सर्व साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटीस दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments