विद्यार्थ्यांनो पालक नियम पाळतात की नाही हे पाहावे
आरोग्यमंत्र्याचे रुग्णालयातून पत्र
मुंबई: राज्यात कोरोना रोगाने सर्वत्र थैमान घातला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याबाबत विद्यार्थी आणि तरुणांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पत्र लिहिले आहे.
पत्रात लिहतांना टोपे म्हणाले, मैदानावर खेळण्याच्या वयात घरात बसाव लागत आहे अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. शाळा महाविद्यालये सुरु झालेली आहेत आणि कोरोनाने परत डोके वर काढले आहे. कोरोना विरुद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. मैदानावर खेळण्याचे हे वय. परंतु, गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसाव लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, असे आरोग्यमंत्री यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी बाहेरून येणाऱ्या पालकांनी हात धुतलेत का? शिवाय ते कोरोनाचे नियम पाळत आहेत का याची पाहणी सुद्धा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या, त्याच बरोबर आपल्या आई वडिलांची, भाव-बहिणींची व तसेच शेजाऱ्यांची सुद्धा काळजी घ्या. ‘आजचा विद्यार्थी व तरुण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरूणांच शरीर, सदृढ, मन सकारात्मक व बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात, असेही राजेश टोपे म्हणाले.