‘ना जाने क्यूsss’, असं म्हणत मिथुनने एक दोन नाहीतर तीन लग्न केले…

मिथुन चक्रवर्ती
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती आज आपला ७२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. मिथुनने आपल्या कारकिर्दीत खूप यश मिळवले, पण एकेकाळी तो नक्षलवादी होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. कुटुंबासोबत झालेल्या अपघातामुळे त्याला नक्षलवादापासून दूर राहावे लागले, परंतु नक्षलवादापासून दूर राहत असताना देखील त्यांच्या जीवाला धोका होता. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी –

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता येथे झाला. मिथुनचे जन्मत: नाव गौरांग होते, मात्र चित्रपटात आल्यावर त्याचे नाव बदलून मिथुन चक्रवर्ती झाले.

मिथुनने रसायनशास्त्रात ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशननंतर मिथुन नक्षलवादी चळवळीत सामील झाला आणि कट्टर नक्षलवादी बनला यादरम्यान तो घरापासून दूर राहिला. दुर्दैवाने मिथुनचा एकुलता एक भाऊ अपघातात मरण पावला. घरची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी नक्षल चळवळ सोडून घराकडे वळला. नक्षलवादाशी संबंध तोडल्यामुळे मिथुनच्या जीवालाही धोका होता, पण असे असूनही तो घाबरला नाही. चळवळीत सहभागी असताना त्याची कुख्यात नक्षलवादी रवी रंजनशी घट्ट मैत्री होती.

मिथुन घरी परतला होता परंतु आता त्याचा कल हिंदी सिनेमाकडे होता. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभिनय शिकून नंतर कामाच्या शोधात तो मुंबईत गेला. अनेक महिने काम न मिळाल्याने त्याला दोन वेळच्या भाकर मिळणे ही अवघड झाले होते. मिथुनने अनेक दिवस उपाशी पोटी रात्र काढली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि प्रतिक्षेनंतर त्याला हेलनचा सहाय्यक बनण्याची संधी मिळाली. मिथुन हेलनचा सहाय्यक पाहून काही चित्रपट निर्मात्यांनी त्याला चित्रपटामध्ये छोट्या – छोट्या भूमिका दिल्या. अमिताभ बच्चन यांच्या ‘दो अंजाने में’ या चित्रपटात मिथुनला छोटी भूमिका मिळाली.

मिथुनने मृणाल सेनच्या ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिथुनच्या फिल्मी करिअरमध्ये एक सुवर्ण काळ आला जेव्हा त्याला 1982 चा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट मिळाला. 100 कोटींची कमाई करणारा हा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट होता. मिथुन हा नॉन डान्सर होता, पण जेव्हा त्याने चित्रपटाच्या गरजेनुसार डान्स केला तेव्हा त्याच्या स्टेप्स देशभर प्रसिद्ध झाल्या.

यानंतर त्यांनी ,गुलाम, आय वॉन्ट जस्टिस , घर एक मंदिर, स्वर्ग ,डिस्को – डिस्को, कमांडो , गुंडा, मुजरीम, प्यार झुकता नहीं , स्वर्ग आणि प्यार का मंदिर या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाची निर्मिती केली, ज्यामुळे तो सुपरस्टार बनला. 1989 मध्ये, मिथुनचे 19 चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले ज्यात प्रेम प्रतिज्ञा, युद्ध, गुरु आणि बीस साल बाद,इलाका, मुजरिम या चित्रपटांचा समावेश होता.

1993 ते 1998 या काळात मिथुनचे जवळपास 33 चित्रपट सतत फ्लॉप होत होते, मात्र त्यानंतर दिग्दर्शकांच्या विश्वासामुळे त्याला आणखी 12 चित्रपट मिळाले. मिथुनने त्याच्या कारकिर्दीत 350 उत्कृष्ट चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत.मिथुनने त्यांच्या कारकिर्दीत 17 चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत, जो हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंतचा एक विक्रम आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी हेलन ल्यूकशी १९७९ मध्ये लग्न केले. हे लग्न फक्त 4 महिने टिकले. मिथुनने आपल्या पहिल्या पत्नीला सोडल्या – सोडल्या लगेच योगिता बालीशी लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. मिथुनने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीलाही दत्तक घेतले आहे, तिचे नाव त्याने ‘दिशानी’ ठेवले आहे. 1984 मध्ये आलेला ‘जग उठा इंसान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फिल्म कॉरिडॉरमध्ये मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली.

दोघांची जवळीक इतकी वाढली की त्यांनी गुपचूप लग्नही केले. जेव्हा मिथुनने योगिता बालीला सोडण्यास नकार दिला तेव्हा श्रीदेवीने त्याच्यापासून वेगळी झाली.

अधिक वाचा :

छोटी सी उम्र मे लग गया रोग! 22 वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली सायरा बानो अन्…


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *