”सावरकर पवारांपेक्षा मोठे” ; राहुल गांधींच्या अटकेची मागणी करताना रणजीत सावरकर काय म्हणाले ?

रणजीत सावरकर
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ उडाला आहे. काँगेस – भाजपमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे.

अशातच सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी याबाबत भूमिका मांडली असून त्यांनी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केलीये.

ते म्हणाले, सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत बदनामी करत आहेत.

याआधीही त्यांनी असे उद्योग केले आहेत. आपण दादर पोलीस ठाण्यात तक्रार करत आहोत, असं सांगत त्यांनी राहुल गांधींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केलीये.

ते म्हणाले की, राहुल गांधींनी प्रचारासाठी यात्रा काढली असेल तर काढावी. पण जर यातून फक्त देशभक्तांचा अपमान करण्याचे उद्योग होणार असतील तर या यात्रेवर बंदी घातली पाहिजे. काँग्रेसनंच हा पायंडा घातला आहे.

शरद पवारांवर टीका होते तेव्हा ती व्यक्ती जेलमध्ये जातो. शरद पवारांची झालेली बदनामीही चुकीची होती. पण जो न्याय त्यांच्या बाबतीत दिला तोच राहुल गांधींच्या बाबतीत झाला पाहिजे. गुन्हा करणारी व्यक्ती लहान आहे की मोठी याकडे कायदा पाहत नाही. सावरकर हे निश्चितच शरद पवारांपेक्षा मोठे आहेत.

”कारवाई झाली पाहिजे”

राहुल गांधींना अटक केली पाहिजे. कारण याच महाराष्ट्रात शरद पवारांवर ट्वीट रिट्वीट केल्याबद्दल एका अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात सावरकरांचा असा अपमान होणार असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही रणजीत सावरकर म्हणाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *