सखाराम बाईंडर ला चढावी लागली होती कोर्टाची पायरी…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

‘सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाल्यानंतर चारही बाजूंनी हा आवाज उठू लागला. सेन्सॉरने या नाटकावर बंदी घातली. दिग्दर्शक कोर्टात गेले. आठ महिन्यांच्या लढाईनंतर ही केस जिंकली. पुन्हा सुरू होण्याची शक्यता होतीच कि पुन्हा काही नेत्यांनी हे गुंडगिरीने नाटक थांबवले. नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले. हो असा वादग्रस्त आणि नाट्यमय प्रवास असणाऱ्या नाटकाचे कथानक अजून किती वजनदार असेल याची कल्पना येते.

विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ रंगमंचावर १९७२मध्ये आले. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे परंतू राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर प्रचंड विरोध, मोठमोठे वाद, बंदी आणि कोर्टकचेऱ्या असं सगळं वादळ अनुभवलेल्या या नाटकाला आणि त्यातल्या कलाकारांना याच नाटकासाठी तितकंच टोकाचं प्रेमही अनुभवायला मिळालं. आणि तेही फक्त तेव्हाच नव्हे, त्यानंतर तब्बल ४५ वर्षांनंतर अभिनेत्री आणि निर्माती मुक्ता बर्वे आणि ललित कला केंद्रातल्या तिच्या सहाध्यायींनी पुन्हा एकदा ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक मोजक्या पाच प्रयोगांसह सादर केलं तेव्हाही तितकाच कौतुकाचा, प्रेमाचा वर्षांव त्यांच्यावर झाला होता.

या नाटकाचा पहिला प्रयोग इ.स. १९७२ मध्ये झाला होता. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजीत याचे भाषांतरही झाले न्यूयॉर्क शहरात दीर्घकाळ पर्यंत प्रयोग होत राहीले. ‘सखाराम बाईंडर’ हे थोडक्यात स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित असणारे एक नाटक आहे. ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हाताळलेला स्फोटक विषय होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

१९७२ मध्ये मध्ये रंगभूमीवर सादर झाले आणि त्याच दरम्यान समीक्षक, कथित अश्लीलमार्तंड यांनी या नाटकावर टीकेची झोड उठवल्यामुळे कोर्टाची पायरी चढाव्या लागलेल्या या नाटकावर अखेर बंदी आणण्यात आली हे आणि हे नाटक बंद पाडण्यात आले. सेन्सॉरसंमत झालेले हे नाटक सखाराम, चंपा आणि लक्ष्मी यांच्यातील दृश्ये आणि शिव्यांसह असलेले संवाद यामुळे वादग्रस्त ठरले होते. कोर्टाने हे नाटक पाहून सुचविलेल्या प्रत्येक कट्च्या वेळी रंगमंचावर लाल दिवा लागत असे. यामुळे रसभंग होत असायचा. शेवटी हे नाटक पाहायला आलेल्या न्यायाधीशांनी देखील हा लाल दिव्याचा ‘व्यत्यय’ काढून टाकायला लावला होता.

अनेकदा तर हे नाटकाला विरोध करणारे लोकं नाटक पाहायला येतात आणि तेच आलेले प्रेक्षक नाटकातच गुंगून जात असायचे. एकदा तर असा प्रसंग घडला कि, या नाटकाच्या विरोधात खटला लढविणार्‍या एका वकिलांच्या पत्नीनेच या नाटकात आक्षेपार्ह असे काय आहे? असा प्रश्न केल्यावर त्यांचेच पतीराज नाटकावर बंदी यावी म्हणून खटला लढवित आहेत, असे त्यांना सांगावे लागले होते. नाटक पाहिलेल्यांनी, आणि त्याहीपेक्षा न पाहिलेल्यांनी ‘या नाटकात अश्लीलता आहे’, ‘या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे’, ‘हे नाटक भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे’, असा ओरडा करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांच्या विचारांना असलेला काहींचा आधीपासूनचा विरोध यावेळी उफाळून आला.

नाटकाचे सलग तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. या बंदीविरुद्ध नाटकाचे दिग्दर्शक श्री. कमलाकर सारंग कोर्टात गेले, आणि आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर केस जिंकले. ‘सखाराम बाईंडर’चे प्रयोग पुन्हा सुरू झाले होते. असे असतानाच, काही राजकीय पक्षांनी झुंडशाहीच्या जोरावर प्रयोग बंद पाडले. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक संमत करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले. या नाटकाचा असा हा भन्नाट आणि वादग्रस्त प्रवास कमलाकर सारंग यांनी ‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

वास्तववादाच्या सीमारेषा ओलांडणारे असे ताकदीचे लिखाण  विजय तेंडुलकर यांनी केले. पुरुषांच्या अहंकाराच्या परिघाचे आणि मर्यादेचे असे उघडपणे वर्णन करणे ही  तेंडुलकरांचे खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सखारामचा घातक अहंकार जपण्यासाठी तो करण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलतो. परंतू त्याचा सामना एखाद्या सामर्थ्यवान स्त्रीशी होतो तेव्हा त्याच्यासोबत काय घडते हे या नाटकात पूर्ण निर्दोषतेसह दर्शविले जाते. त्यातले संवाद केवळ तीक्ष्ण आणि परखड नव्हते तर नैतिकतेच्या मानकांनाना आव्हान देणारे आहेत.  इतर नावाजलेले सर्व नाटकांपैकी विजय तेंडुलकर यांची ‘सखाराम बाईंडर’ एक उत्कृष्ट निर्मिती आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *