मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका महत्वाची?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

NIA कडून ताबा मिळविण्यासाठी ATS प्रयत्नशील

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आले होते. तपासा दरम्यान ते वाहन ठाण्यातील व्यापरी मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले होते. त्यानंतर हिरेन याचा मृतदेह ५ मार्च रोजी रेतीबंदर येथील खाडीत आढळून आला होता. एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी हिरेन प्रकरणात पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हिरेन यांची हत्या मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचे स्पष्ट केले.

            सिंग म्हणाले, ६ मार्च रोजी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएस कडे वर्ग करण्यात आला. दुसऱ्या दिवशी यासंबंधी सगळी कागदपत्रे आम्ही ताब्यात घेतली. त्याच दिवशी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे आम्ही खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आम्ही सुरु केला घटनास्थळी आम्हाला कुठलेही पुरावे मिळाले नाही.

वाझेंनी आरोप नाकारले

८ मार्चला सचिन वाझे यांचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. स्कॉर्पिओ आपल्या ताब्यात नव्हती असे सांगितले. हिरेन यांना ओळखत नसल्याचे सांगितले. या गुन्ह्यात आपण नसल्याचे सांगितले. या गुन्ह्यात वाझे यांचा काय सहभाग आहे याचा तपास करत असल्याचे जयाजित यांनी सांगितले.

यात अजून काही जणांना अटक करणार

दमन मधून एक कार जप्त करण्यात आली आहे. ही कार गुन्ह्यात वापरली की नाही याचा तपास सुरु आहे. सखोल चौकशी सुरु आहे. पुढील काही दिवसात काही जणांना अटक करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाझेंचा ताबा घेणार

सचिन वाझे हे NIA च्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात वाझे यांची चौकशी करायची आहे. आम्ही त्यासाठी ट्रान्स्फर वारंट मिळविला आहे. २५ तारखेला NIA कोर्टात सुनावणी होणार आहे त्यावेळी आमच्या ताब्यात द्यावे अशी विनंती करणार अशी माहिती जयजित सिंग यांनी दिली.   


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *