सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ
पुणे : व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात विवादित पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव घेण्यात येत आहे. यामुळे त्यंच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तर सचिन वाझे यांना अटक करा अशी मागणी करण्यात येत होती. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबात सुद्धा सचिन वाझे यांनीच हत्या केल्याचे म्हणले आहे.
यानंतर आता सचिन वाझे यांनी १२ मार्च रोजी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अटके पासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. ती सुद्धा फेटाळून लावण्यात आली आहे. यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या प्रकरणात १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या वाहनात स्फोटक सापडले होते. वाहनाच्या मालकाचा मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती. त्याचा तपास ATS करत आहे. तर स्फोटकांचा तपास NIA कडे आहे. ATS च्या तपासाला वेग आला आहे. मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान NIA कडून सचिन वाझे यांचा जबाब नोदविण्यात येत आहे.
सचिन वाझे यांच्या whatsup स्टेट्सची चर्चा
दोन दिवसापूर्वी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे. तर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. व अटकेपासून सुद्धा संरक्षण नाकारले आहे. त्यानंतर त्याच्या whatsup स्टेट्सची चर्चा सुरु झाली आहे. त्यात त्यांनी जगाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. असे सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.