शेवटच्या दिवसापर्यंत सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात होते?
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन सापडल्यानंतर रोज नवीन खुलासे बाहेर येत आहे. तसेच वाहन मालकाचा मृत्यू नंतर या प्रकरणाला वेगेळे वळण लागले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. मनसुख हिरेन याच्या मृत्यूचा तपासा ATS करत आहे. तर स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.
ATS च्या तपासात सचिन वाझे हे मनसुख हिरेनच्या सातत्याने संपर्कात होते अशी माहिती सीडीआर मधून समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या सीडीआर मधून हेही समोर आले की ३ व ४ मार्च रोजी पर्यंत ते मनसुख हिरेन यांच्या संपर्कात होते. पहिल्यांदा हा सचिन वाझे यांच्याकडे होते. नंतर क्राइम ब्रांचचे नितीन अलक्णुरे यांच्याकडे तपास देण्यात आला.
तपास काढून घेतल्यानंतर मनसुख हिरेन आणि त्यांच्यात काय चर्चा झाली हे ATS ला जाऊन घायायचं आहे. ATSने याबाबत पूर्वी सचिन वाझे यांच्याशी चर्चा केली मात्र ते समाधानी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वाझे यांनी २ मार्चला हिरेन यांच्याकडून पत्र लिहून घेतले होते. त्यात काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार मला त्रास देत असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला होता. ते पत्र लिहून घेण म्हणजे मृत्यूच नियोजन करू घेणे होत का असा प्रश्न ATS ला पडला आहे.
यामुळे स्फोटक प्रकरणा बरोबर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास सचिन वाझे यांच्याकडे करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.