रितेश जिनिलियाच्या ‘वेड’ची घोडदौड कायम, मराठी सिनेविश्वात रचले अनेक विक्रम

वेड या चित्रपटाने फक्त महाराष्ट्र नव्हे तर अख्या देशाला त्याच वेड लावले आहे. प्रदर्शनाच्या १३व्या दिवशी सुद्धा वेड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरवातीच्या वीकेंडच्या तुलनेत अधिक कमाई केली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा-देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम आहेत.
२०१६ साली आलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट या सिनेमाच्या दुसऱ्या आठड्यातील वीकेंडच्या कमाई पेक्षा रितेशच्या वेड ने अधिक कमाई केली आहे. कमी कालावधीमध्येच ‘वेड’ प्रेक्षांकाचा पसंतीस उतरला आहे. ‘वेड’ या चित्रपटा सोबत रितेशने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेे आहे, तसेच जेनेलिया ने देखील तेलगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीनंतर मराठी चित्रपटविश्वात तिचे पदार्पण केले आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझाचा ‘वेड’ एका जोडप्याची गोष्ट आहे जे रितेश आणि जेनेलियाच्या जोडीने साकारले आहे. दिवसेंदिवस सिनेमाच्या वाढणाऱ्या कमाई वरून प्रेक्षकांना रितेश-जेनेलियाच पडद्यावरील काम आवडतंय असे म्हणता येईल. त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच लक्ष वेधून ठेवलेे आहे.
प्रदर्शनाच्या १३व्या दिवशी वेड ने बॉक्स ऑफिसवर १.१० कोटींची कमाई केली आणि आतापर्यंत एकूण ३५.७७ कोटींची कमाई केली आहे. वेड ने सुरुवातीच्या वीकेंड्स मध्ये २० कोटीपेक्षा अधिक कमाई केली होती. या चित्रपटाच्या निर्मिती साठी १५ कोटींचे बजेट लावण्यात आले होते
वेड चित्रपटाचे इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनी कौतुक केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता ‘करन जोहर’ याने देखील रितेश आणि जेनेलियाच कौतुक करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आणि दोघांचे कौतुक केले.
वेड हा चित्रपट मूळ तेलुगू चित्रपट “मजिली” या सिनेमाचा रिमेक आहे. मजिली या चित्रपटात नागाचैतन्य आणि तेलगू इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. मजिली चित्रपट ३० दिसंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि शिवा निर्वाणाने दिग्दर्शन केले होते.
सुरुवातीच्या वीकेंड्समध्ये मजिली ने ४५.६० कोटी,२८ दिवसात ६८.०५ कोटी देशात आणि ३८.५२ कोटींची कमाई जगभरात केली होती. नागाचैतन्य आणि समंथाच काम प्रेक्षांकाना आवडले होते आणि हा चित्रपट लोकप्रिय देखिल झाला होता. त्यामुळेच मजिली सारखेच ‘वेड’चेही नाव लोकांच्या मनात कोरण्यात वेड बऱ्याचअंशी यशस्वी ठरलेला आहे असे दिसत आहे.