पुण्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या, निर्बंध येण्याची शक्यता?
पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अक्टीव्ह संख्या १ हजार ३०० पर्यंत खाली होती. मात्र शहरात मागच्या एका महिन्यात ५ पट रुग्ण वाढले आले आहेत. यामुळे पुढील काही निर्बंध लावण्याची शंका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. काल दिवसभरात पुण्यात १ हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले. ही चिंता वाढविणारी बाब आहे. मात्र अजूनही परिस्थती नियंत्रणात असल्याचे महापौर यांनी सांगितले. नागरिकांना आरोग्य विषयीच्या सुविधा पुरविण्यात येत आहे. टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. नायडू रुग्णालयात नव्याने ऑक्सिजन टंक बसविण्यात येत असून नागरिकांना अडचण येईल अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर लसीकरनाचे काम जोरात सुरु आहे.
काही गोष्टीवर निर्बंध लागणार
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता २ दिवसानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या बरोबर प्रशासनाची बैठक होणार आहेत. त्यात सर्व गोष्टींचा विचार करण्यात येईल. सध्या रात्रीचे निर्बध आहेत. शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लास बंद आहेत. परंतु वाढती बाधितांची साखळी तुटत नसल्याचे दिसून येत आहे. जिथे गर्दी होते तेथे निर्बंध लावण्यात येतील. विशेषत व्यायामाशाळा, पोहण्याचे तलाव. हॉटेलच्या वेळेत बदल करण्याचा विचार आहे. शनिवार, रविवारी काही कडक नियम लावता येतील का याबाबत सुद्धा चर्चा होईल. आरोग्य यंत्रणा कार्यक्षम असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.