मोदींच्या पत्राला इम्रान खान यांच्याकडून उत्तर, काश्मीर प्रश्नावर म्हणाले…
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी उत्तर पाठविले आहे. यात त्यांनी भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर दोन्ही देश काश्मीर प्रश्न सोडवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
पाकिस्तान दिनानिमित्त २३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना पत्र लिहले होते. पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता या पत्राला उत्तर देताना इम्रान खान यांनी पत्र लिहिले आहे. पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पत्राबद्दल तुमचे आभार. पाकिस्तानी लोकांना हा दिवस त्यांच्या संस्थापाकाला. श्रद्धांजली अर्पण करून आठवला. भविष्याकडे पाहत त्यांनी स्वतंत्र, स्वायत्त देशाची कल्पना केली. असा देश जिथे जनता आपल्या क्षमते नुसार मुक्तपणे जगू शकतात.
शेजाऱ्यांना सोबत शांतता हवी
इम्रान खान यांनी या पत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानला आपल्या शेजारी राष्ट्रांशी शांततेत संबंध राखायची इच्छा आहे. यात भारताचाही ही समावेश आहे. आमचा विश्वास आहे की दक्षिण आशिया खंडातील शांतता आणि स्थिरतेसाठी भारत आणि पकिस्तानमधील सर्व विषयांचे निराकरण करणे गरजेचे आहे. विशेषता जम्मू काश्मीर वाद सोडविणे गरजेचे आहे. दोन्ही देशांना निकलभिमुख आणि विधायक संवाद हवा असेल तर संवादाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.