‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या शहराचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. असे असतानाच आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. तर या नावास हिंदू महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय आहे अमोल मिटकरींचे ट्विट?

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

हिंदू महासभेचा विरोध का?

तर पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्यास हिंदू महासंघाने विरोध केले आहे. “जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदणीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे.

स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे,” अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *