Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचा९० च्या पराभवाची आठवण करून दिली अन्, नेटकऱ्यांची मने जिंकली

९० च्या पराभवाची आठवण करून दिली अन्, नेटकऱ्यांची मने जिंकली

पुणे: जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू अशी ओळख असणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी फेसबुकवर आपल्या निवडणुकीतील पराभवाची पोस्ट लिहून नेटकऱ्यांची मने जिंकली. ३० वर्षानंतर सुद्धा आपल्या पराभवाची कबुली देत खिलाडूवृत्ती दाखविल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.  

अंकुश काकडे हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून लढले होते. यात त्यांचा ९ हजार पेक्षा जास्त मताने पराभव झाला. शिवसेनेच्या शशिकांत सुतार यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे जाऊन युती सरकारच्या काळात शशिकांत सुतार मंत्री झाले होते.

२८ फेब्रुवारी १९९० ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून पराभव झाल्याची पोस्ट अंकुश काकडे यांनी आज फेसबुकवर लिहिली आहे. त्यानंतर अनेक जणांनी त्या निवडणुकीतील आपल्या आठवणी सांगितल्या. अशा प्रकारे पराभवाची कबुली देऊन अंकुश काकडे यांनी नेटकऱ्यांची मने जिंकून घेतले. त्यांच्यासोबत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आठवणी जागवल्या.

शशिकांत सुतार यांची फर्ग्युसन कॉलेज समोर लावण्यात आलेली प्रचार कमान कशा प्रकारे जाळली याची प्रांजळ कबुली एका कार्यकर्त्याने दिली.तेव्हा त्या कार्यकर्त्याचे वय पंधरा वर्ष होते. पूर्वी निवडणुकांमध्ये निकोप स्पर्धा होती, राजकारण केवळ निवडणुकी पुरते होते, राजकारणामुळे मैत्री बिघडली नाही असेही अनेकांनी मान्य केल. सर्वजण राजकीय विजय लक्षात ठेवतात, त्याच विजयांच्या आठवणीना उजाळा देतात मात्र काकडे यांनी निवडणुकीतील पराभवाची ३० वर्षानंतरही आठवण काढली. हे दुर्मिळ आहे. काकडे यांनी १९८०, १९९० आणि १९९९ मध्ये शिवाजीनगर विधानसभा  मतदार संघातून तीन वेळा निवडणुका लढले आहेत. दुर्दैवाने यात त्यांचा सातत्याने पराभव झाला पण ‘ पराभवाची राणी असते सर्वात शहाणी’ या न्यायाने पराभवही मोठी शिकवण व राजकीय प्रगल्भता देवून जातो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments