रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा; रुग्णाच्या नातेवाईकांची खरेदीसाठी वणवण

पुणे: पुणे शहर पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. सध्या शहरात जवळपास ५० हजार रुग्ण ॲक्टिव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील १ हजार जण गंभीर असून त्याच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कोरोणाच्या गंभीर रुग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन गरजेचे आहे. मात्र, हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची खरेदीसाठी कष्ट पडत आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी रांगेत लागल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशासनाच्या वतीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर रुग्णांना वेळेत रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.
पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक तासनतास पुना हॉस्पिटल बाहेर ताटकळत उभे आहे, मात्र अपुरा साठा असल्याने इंजेक्शन मिळणे अवघड
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत असून कोटा वाढून मिळावा यासाठी केंद्र सरकार कडे मागणी केल्याचे काही दिवसापूर्वीच सांगितले होते.
पुण्यात सरासरी दिवसाला ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर १ हजार रुग्ण गंभीर आहे तर ५ हजार रुग्णालयात ऑक्सिजनची गरज भासत आहे.जर वेळेत रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात पुरवठा झालं नाही तर मृत्यूची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.