डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरीच रेमडेसिविरचा वापर करू नये!

‘होम आयसोलेशन’साठी आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स
नवी दिल्ली : होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचा किंवा टोचून घेण्याचा प्रयत्न करू नये, केवळ रुग्णालयातच रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाऊ शकतात असे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. कोविड १९ च्या हलकी लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
होम आयसोलेशन’साठी आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स –
६० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांनी किंवा हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचा आजार असणाऱ्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं होम आयसोलेशनमध्ये राहावं.
हलकी लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना ‘स्टेरॉईड’ दिले जाऊ नयेत तसंच सात दिवसानंतरही लक्षणं कायम राहिली (ताप, सर्दी, खोकला इत्यादी) तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी तीव्रतेची ‘ओरल स्टेरॉईड’ वापरता येऊ शकतील.
रुग्णांना किंवा हलकी लक्षणं जाणवणाऱ्या नागरिकांना गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा किंवा दिवसातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
६५० एमजी पॅरासीटेमॉल दिवसातून चार वेळा घेतल्यानंतरही ताप नियंत्रणात आली नाही तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी कमी झाल्यास किंवा श्वासोच्छवासात अडथळे जाणवल्यास रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन डॉक्टरांकडून त्वरीत सल्ला घ्यायला हवा
रुग्णांना किंवा हलकी लक्षणं जाणवणाऱ्या नागरिकांना गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा किंवा दिवसातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.