रेमडेसिवीर ही काय जादूची गोळी नाही; त्याचा वापर करण्यात येतो कारण की…

दिल्ली : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडा यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. मात्र याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन ही काय संजीवनी नाही. त्यामुळे मृत्युदर कमी होत नाही. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रतीच अँटी व्हायरल औषध नसल्याने त्याचा वापर करण्यात येतो असे मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आज व्होडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात डॉ. रणदीप गुलेरिया, आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल हे सहभागी झाले होते. यावेळी डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिवीर वापर आणि त्याची नेमकी गरज याबाबत महिती दिली.
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, आता कोरोना या आजाराला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पण याबाबत अजूनही कुठलाही डेटा उपलब्ध होऊ शकला नाही. खर तर या सगळ्यात रेमडेसिवीरविषयी चर्चा करण्यात येत आहे. याबाबत सांगतो कि, रेमडेसिवीर ही काय जादूची गोळी नाही. आपण ती वापरतो याचे कारण म्हणजे आपल्याकडे चांगल्या प्रतीच अँटी व्हायरल औषध नाही. आपण कुठलेच नवीन चांगले अँटी व्हायरल औषध तयार केले नाही.
रेमडेसिवीर हे कोणाला, कोणत्या परिस्थिती दिल गेल पाहिजे याला फार महत्व आहे. जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि ज्यांची ऑक्सिजनची पातळी कमी आहे अश्यांना दिले पाहिजे. रेमडेसिवीर हे रुग्णाला फार अगोदर किवा शेवटी देऊन चालत नाही. रुग्णाला पाचव्या किवा सातव्या दिवशी दिले तरच फायदा होते. रेमडेसिवीरमुळे मृत्युदर कमी होते हे अस अद्याप तरी संशोधनातुन आढळून आले नाही. असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.