११ तास उलटूनही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरू नाही; नागरिक हैराण

मुंबई : देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी २८ एप्रिल (आज) पासून रजिस्ट्रेशन सुरु होईल असे सांगण्यात आले होते. मात्र ११ तास उलटून गेल्यानंतरही रजिस्ट्रेशन होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला परवानगी दिली आहे. या वयोगटातील नागरिकांचं प्रमाण अधिक असल्यानं आता लसीकरणासाठी नोंदणीबाबतही चर्चांना सुरुवात झाली आहे. अगोदर लसीकरणासाठी नोंदणीला २४ एप्रिलपासून सुरुवात होणार अशी चर्चा होती. पण सरकारनं २४ नव्हे तर २८ एप्रिलला नोंदणी सुरू होणार असल्याचं स्पष्ट केले होते.
कोरोनाच्या लसीकरणासाठी १८ वर्षावरील सर्वांना सरकारनं पात्र केल्यानंतर आता यासाठी तयारी सुरू झाली आहे. नागरिकांमध्येही यासाठी उत्सुकता आहे. लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर तसंच आरोग्यसेतू अॅपद्वारे नोंदणीसाठी काल रात्री पासून प्रयत्न करत आहे. मात्र, नोंदणी होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
१ मे पासून लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी स्वतःच नोंदणी करणं गरजेचं आहे. तसंच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी नोदणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नाव नोंदणी होत नसल्याने नागरिक हैराण आहेत.
रजिस्ट्रेशन cowin.gov.in आणि Aarogya Setu अॅपवरून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता ११ तास उलटून गेल्यानंतरही नोंदणी होत नाही.