वेळीच ओळखा कॅन्सरची लक्षणे…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कर्करोग हा अशा स्वरूपाचा रोग आहे जो आपल्याला झाला असेल का? किंवा होऊ शकतो का? हे ठामपणे सांगता येत नाही. तो पूर्णपणे बरा होऊ न शकणारा आजार आहे. ज्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही संशोधन करीत आहेत. अशी काही कारणे आणि लक्षणे आहेत ज्याद्वारे आपण आपल्याला कॅन्सरचा धोका होऊ शकतो का, हे ओळखण्यास आपल्याला मदत होते. यातलं मुख्य कारण म्हणजे व्यसन, तंबाखू, सिगारेट. ही प्रमुख दोन कारणे असली तरीही या व्यतिरिक्त बदलत्या जीवनशैलीमुळे चुकीचा आहार, प्रदूषण, जंकफूड इत्यादी कारणांमुळे देखील कॅन्सरचा धोका होऊ शकतो असा निष्कर्ष अलीकडेच संशोधनातून समोर आला आहे.

सध्याच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला देखील वेळ मिळत नाही. परिणामी व्यस्त शेड्युल, वेळेत सकस आहार न मिळणे, अतिरिक्त ताण तणाव, नैराश्य अशा अनेक गोष्टी आपल्याला हळू-हळू कर्करोगाच्या दरीत ढकलत असतात. त्यात अजून एक संकट म्हणजे कर्करोगाचे निदान झाल्याचे समजते. बऱ्याचदा अंतिम टप्प्यात निदान झाल्यामुळे आणि वेळेवर योग्य ते उपचार करुन काही रुग्ण बरे होतात तर काही होत नाहीत.

कॅन्सरचे प्रकार व त्याचे वर्गीकरण हे शरीराच्या अवयवांवर आणि शरीराच्या भागांवर अवलंबून असते. स्तनाचा, गर्भाशयाचा, तोंडाचा, प्रोस्टेट, पोटाचा, फुफ्फुसांचा, रक्ताचा, अंडशयाचा यकृताचा, घशाचा, त्वचेचा, गुदाशयाचा, मेंदूचा, मूत्रपिंडाचा, स्वादुपिंडाचा कॅन्सर तसेच योनीचा कॅन्सर अशी कॅन्सरचे प्रकार आहेत.

कॅन्सर होण्याची कारणे:

 • धुम्रपान, तंबाखूजन्य उत्पादनांचा सेवनामुळे तोंडाचा किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर होतो.
 • अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे यकृताचा कॅन्सर होतो.
 • कुटुंबात कुणाला कॅन्सर झाला असलेला तर स्तना सारख्या विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
 • वाढत्या वयानुसार कोलन कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर इत्यादी प्रकारची कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
 • डांबर आणि अनिल इन सारख्या रसायनांच्या संपर्कात येणाऱ्यांना मूत्राशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
 • लठ्ठपणा, अतिरिक्त चरबी वाढवणारे पदार्थांचे सेवन, मर्यादित शारीरिक हालचाली यामुळे पुरुष आणि महिला दोघांमध्येही अनेक प्रकारचे कॅन्सरचा धोका असतो.
 • महत्वाचं एक कारण म्हणजे ताण-तणाव. ताणतणावाचा दूरगामी परिणामामुळे कॅन्सरचा धोका अधिक पटीने जणावतो. तसेच रुग्णाला भूतकाळातील वैद्यकीय परिस्थितीमुळे रोगप्रतीकार शक्ती कमकुवत झाल्यामुळे त्या रुग्णाला कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.

कॅन्सरची लक्षणे:

 • अशक्तपणा, झपाट्याने वजन कमी होणे किंवा वाढणे.
 • भूक न लागणे, अन्न गिळायला त्रास होणे.
 • वारंवार ताप आणि घाम येणे.
 • त्वचेवर वारंवार जखमा होणे, सहजपणे खरचटणे.
 • त्वचेतील बदल जाणवणे, त्वचेखाली गाठ येणे.
 • सांधे दुखणे, स्नायू आणि जखम भरून निघण्यास वेळ लागणे.
 • श्वासोच्छवासाचा त्रास होणे तसेच महिनाभर पेक्षा जास्त काळ खोकला असणे.

तुम्हाला वरीलपैकी कोणतेही एक जरी लक्षण आढळले तर तुम्ही तातडीने डॉक्टरांना बोललं पाहिजे. जितक्या लवकर जाणवणाऱ्या लक्षणांची तपासणी करू तितक्या लवकर आपल्याला धोका असलेल्या आजारांचे निदान होऊन, लवकरात लवकर उपचार घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते. पण सर्वांना सगळीच लक्षणे दिसतील असे नाही. काही रुग्णांना काहीच लक्षणे दिसू शकतील किंवा काही लक्षणांची तीव्रता कमी असू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

कॅन्सरचा उपचार प्रामुख्याने दोन प्रकारांनी केला जातो. सर्जिकल पद्धत आणि दुसरी शस्त्रक्रिया नसलेली पद्धत म्हणजे किमोथेरपी. सर्जिकल पद्धतीमध्ये अनैसर्गिक वाढ किंवा पेशींचा गोळा काढून टाळण्यात येतो. विशिष्ट तो भाग काढण्यात येतो.त्याला बायोप्सी म्हटले जाते. तर किमोथेरपी म्हणजे पेशींच्या गाठी औषधांच्या मदतीने नष्ट कारणे आणि रेडिओथेरपी म्हणजे ज्यात वाढत्या ट्युमर वर सोडण्यासाठी गामा किरणांची मदत घेतली जाते. शस्त्रक्रिया केल्यानंतर इतर ठिकाणी त्याचा प्रसार होऊ नये म्हणून किमोथेरपी केव्हा रेडिओथेरपी विशेष घेतली जाते.

उपाय:

कॅन्सर रुग्णाने त्यांच्या राहणीमानात अगदी काही किरकोळ बदल केल्यास त्यांच्या रिकव्हरी लवकरात लवकर होऊ शकते. भविष्यातही कॅन्सर पुन्हा डोकावू नये म्हणून लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणारे काही उपाय म्हणजे;

 • सकर आणि घरी बनवलेले पौष्टिक आहार घेणे.
 • तंबाखू व मद्यपान, धुम्रपान टाळणे.
 • नियमितपणे व्यायाम कारणे, आठवड्यात किमान पाच दिवस दररोज तीस मिनिटांचा सलग व्यायाम केल्याने तसेच तीस मिनिटाचा झटपट चालल्याने मदत होऊ शकते.
 • ध्यानधारणा, योगासन प्राणायाम कारणे.
 • मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी त्या व्यक्तीने त्यांची छंद, आवड जोपासावी.
 • ताणताणावावर नियंत्रण ठेवावे.
 • नेहमी आनंदी प्रसन्न आणि सकारात्मक राहणे.
 • सर्वच कॅन्सर हे प्राणघातक नसतात हे सुरुवातीला मनावर बिंबवणे.
 • नियमित आरोग्य तपासणीला जाने.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *