राऊतांच्या पाठपुराव्याला यश, आर्यन शुगरकडून मिळणार एफ.आर.पी.

राजेंद्र राऊत
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आर्यन शुगर या साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची ( एफ.आर.पी. ) २१ कोटी रुपये रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश दिले असल्याची माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.

यापूर्वी ८ सप्टेंबर २०२२ रोजी मिलींद शंभरकर यांनी आर्यन शुगर या साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कम २१ कोटी वसुलीबाबत बैठक आयेाजित केली हेाती. त्यानुसार बैठकीत पुढील १५ दिवसांत थकीत ऊस बिलाचा अंतिम निर्णय घेण्याचे ठरले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत शंभरकर यांनी शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश दिले आहेत. सदर बैठकीस राजेंद्र राऊत यांच्यासह, साखर संचालक, जिल्हा उपनिबंधक, सरव्यवस्थापक- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच बार्शीचे तहसीलदार उपस्थित होते.

सदरची रक्कम देण्याकरिता बार्शीच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून, या समितीत साखर आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रतिनिधी, आर्यन शुगरचे सभासद शेतकरी प्रतिनिधी व आर्यन शुगरचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

या आदेशानुसार आर्यन शुगर कारखान्याचे संचालक बजरंग सोनवणे यांनी थकीत ऊस बिलाची एफ.आर.पी. दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले असल्याने राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे पाहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळून त्यांची दिवाळी गोड होईल, अशी अशा आहे.

अधिक वाचा :

शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ लढ्याला यश ; आंदोलनानंतर मिळाले घामाचे पैसे


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *