|

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच काळात कोरोना विषाणूने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरे यांनी स्वत:च ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच स्वत:ला  क्वारंटाईन करून घेतलं होतं. त्यानंतर आता रश्मी ठाकरे यांना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ११ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. जेजे रुग्णालयामध्ये त्यांनी पहिला डोस घेतला. मात्र, याच्या काही दिवसांनंतरच रश्मी ठाकरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काल त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना खोकल्याचा त्रास होत आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंनाही कोरोना

आदित्य ठाकरे यांनी २० मार्चला ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *