फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार?
मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचे नाव समोर येत आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे. त्याच बरोबर रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहे. अहवाल नंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले असल्याचे बोलण्यात येत आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग, परमवीर सिंह यांचे आरोप, सिंह यांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीला जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, अनिल परब आदी उपस्थित होते.
भाजप शुक्ला यांचा बाचावात
आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या बचावासाठी भाजप नेते मैदानात उतरले आहेत. राज्य सरकार चौकशीची भाषा करून रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव आणीत आहे.
असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला. रश्मी शुक्ला यांनी आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर यांना धमकविल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.