|

रश्मी शुक्ला यांनी अवैध्यरित्या फोन टॅप केले

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

त्या भाजपच्या एजंट   

मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर पोलिसांच्या बदल्या बाबत टिका केली होती. तसेच बदल्याचा रॅकेट बाबत माहिती असून सुद्धा कारवाई केली नाही. ती माहिती देणाऱ्या रश्मी शुक्ला यांची बढती रोखल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले.

            रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत असा खळबळजनक आरोप सुद्धा मलिक यांनी केला. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार बनत होते. त्यावेळी रश्मी शुक्ला या अवैध्यरित्या राज्यातील अनेक नेत्याचे फोन टॅप करत होत्या. बदल्यांच्या रॅकेट संदर्भात फडणवीसांच्या म्हणण्यानुसार शुक्ला यांनी परवानगी घेऊन फोन टॅप केले. पण शुक्ला यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी सादर केल्या त्यानुसार राज्यात बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याच सिद्ध होते. हे सर्व फडणवीस यांना माहित आहे, मात्र ते सरकारची बदनामी करण्यासाठी याचा उपयोग करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

            गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. ते २७ फेब्रुवारी पर्यंत कोणालाही भेटले नाही. फडणवीस केवळ बेछुट आरोप करत सुटले आहे. सरकारला बदनाम करण्याचा काम करत आहे. राजकीयदृष्ट्या हे सरकार पडता आले नाही. म्हणून आता अधिकाऱ्यांचा वापर करून ते सरकार पडण्याच षडयंत्र रचत असल्याचा आरोप सुद्धा मलिक यांनी यावेळी केला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *