Tuesday, October 4, 2022
Homeराजकीयन्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल; कायदा काय सांगतो??? वाचा सविस्तर…

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल; कायदा काय सांगतो??? वाचा सविस्तर…

बॉलीवूड स्टार रणवीर सिंग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या लक्षवेधी कपड्यांसाठी ओळखला जातो. निरनिराळ्या कपड्यांमुळे त्याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल व्हावं लागलं. अशातच मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी ‘पेपर’ नावाच्या अमेरिकन मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं.

रणवीरच्या या फोटोशूटमुळे एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. या प्रकरणानंतर अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं. तर काहीनी ट्रोल देखील केलं. न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीरला चांगलंच महागात पडल्याचं पहायला मिळतंय. या सर्व प्रकारानंतर रणवीर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रणवीर सिंगच्या विरोधात दोन ठिकाणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेने आणि ठाण्यातील एक वकील वेदिका चौबे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता रणवीरच्या अडचणी वाढल्या आहेत

तक्रारदारांचे वकील अखिलेश चौबे यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा रणवीर सिंगचे न्यूड फोटो झूम केले गेले तेव्हा त्याचे ‘प्रायव्हेट पार्ट्स’ दिसत होते. यामुळे ‘महिलांच्या भावना’ दुखावल्या गेल्या असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

रणवीर सिंग हा एक लोकप्रिय अभिनेता असल्याने त्याचे चित्रपट पाहून तरुण पिढी प्रोत्साहित करतात. पण त्याने पोस्ट केलेले हे फोटो फार अश्लील आहेत आणि केवळ पैशाच्या लालसेपोटी त्यांने हे केल्याचं दिसतंय. त्यामुळं त्याला शिक्षा व्हायला हवी, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबईत रणवीरविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293 आणि 509 अन्वये आयटी कायद्याच्या कलम 67 (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंगच्या पोस्टला इंस्टाग्रामवर सुमारे 22 लाख लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी त्याचं कौतुक देखील केलंय.

रणवीरने केलंय तसं कोणतंही काम किंवा साहित्य अश्लीलतेच्या कक्षेत कधी येतं? आणि भारतातील कायदा याबाबत काय सांगतो? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कलमांतर्गत तरतुदी काय आहेत?

रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे अश्लील साहित्य पोस्ट करणे, या आयटी कायद्याच्या कलम 67 (A) नुसार गुन्हा आहे. यात आरोपीला 5 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षेची तरतूद आहे.

या कलमानुसार, जरी अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असेल तरी देखील आरोपीच्या अटकेची गरज नाही, असं कायदातज्ञ सांगतात. भारतीय दंड संहितेच्या कलम 294 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. अश्लीलतेच्या कृतीमुळे इतरांना त्रास होत असेल तर या कलम गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

भारतीय दंड संहितेच्या कलम 292 नुसार, रेखाचित्रे विकणे, प्रसारित करणे, अश्लील पुस्तके, पत्रिका, चित्रे, पेटींग करणं हा गुन्हा आहे. पण लोकहितासाठी तयार करण्यात आलेले विज्ञान, साहित्य, कला किंवा काही शिकण्यासाठी एखादे पुस्तक तयार केले असेल अशा परिस्थितीत हा कायदा लागू होत नाही.

292 कलमानुसार दोषी ठरल्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. रणवीर सिंगवर 509 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्त्रीचा विनयभंग करण्याच्या दृष्टीने कृती केल्यास या कलमांतर्गत गुन्हा दाखल करता येतो. आरोप सिद्ध झाल्यास 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.

दरम्यान, याआधी पूजा भट्ट, विद्या बालन, ट्विंकल खन्ना, मल्लिका शेरावत, शिल्पा शेट्टी, रीमा सेन, मधू सप्रे आणि मिलिंद सोमन यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, बहुतांश प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

हे ही वाचा की-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments