राजेश टोपेंनी पत्राद्वारे केले जनतेला आव्हान
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, बच्चू कडू आणि आज छगन भुजबळ असे लोकप्रतिनिधी नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या साथरोगाने पुन्हा उच्चांक गाठला आहे. अश्यातच, राजेश टोपे यांनी रुग्णालयातून जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे कोरोना संबंधित कळकळीचे आव्हान त्यांनी केले आहे.
पत्रात लिहताना ते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची परवा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे विशेषतः आरोग्यसेवक, नर्सेस, डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो,’ अस म्हणत टोपे यांनी कोरोना योध्यांच कौतुक केल आहे.
कोरोन संदर्भात पुढे पत्रात बोलतान टोपे म्हणाले कि, ‘कोरोना पुन्हा डोक वर काढत आहे. तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. तेव्हा परत एकदा सर्वांना एकत्र येऊन लढावे लागणार आहे. माझी सुद्धा रुग्णालयात कोरोनाविरोधात झुंज सुरु आहे. त्यामुळे त्याला हरवून परत एकदा कोरोना विरुद्धच्या सामुहिक लढाईत मी सहभागी होणार आहे, ‘ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.