राजामौलीच्यां RRR सिनेमातील “नातू-नातू” गाण्याने कोरले ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारावर नाव

नातू-नातू
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

८० वा गोल्डन ग्लोब २०२३ अवॉर्ड्स ‘द बेव्हरली हिल्टन’ या ठिकाणी ११ जानेवारी रोजी पार पडला. पुरस्कार सोहळे नेहमीच प्रेक्षकांसाठी खास असतातच पण ह्या वेळेस हा सोहळा भारतीय सिनेसृष्टीसाठी काहीसा जास्त खास ठरला.

जगाला नातू-नातू च वेड लावत, ‘एस.एस.राजामौली’ दिग्दर्शित ‘आर.आर.आर’ मधील नातू-नातू गाण्याने ”सर्वोत्तम मूळ गाणे” (मोशन पिक्चर्स) ह्या श्रेणी अंतर्गत अवॉर्ड स्वीकारला. ‘ नातू-नातू ‘ गाणं ज्येष्ठ संगीतकार एम.एम.कीरवानी द्वारा रचित आहे.

आर.आर.आर चित्रपटाची निवड ”सर्वोत्तम गैर इंग्रजी चित्रपट”आणि ”सर्वोत्तम मूळ गाणे” साठी झाली होती, सर्वोत्तम गैर इंग्रजी चित्रपटाच्या श्रेणीत ”अर्जेन्टिना,१९८५” ह्या चित्रपटाने बाजी मारली. हा चित्रपट अभियोजक ज्युलिओ स्ट्रासेरा आणि लुईस मोरेनो ओकॅम्पो यांच्या सत्य कथेपासून प्रेरित आहे. आर.आर.आर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक विशेष जागा निर्माण केली आहे.

ह्या चित्रपटाचे गाणे, कलाकार, संवादाने लोकांच्या मनात एक ठसा उमटवेला आहे. भारतीय सिनेसृष्टीत अभिमान पात्र ठरलेला आर.आर.आर फक्त भारतापर्यंत सीमित न राहता सातसमुद्रा पलीकडची झेप घेत,ऑस्कर पर्यंत जाऊन पोहोचलाय. नातू-नातू गाण्याची रचना ज्येष्ठ संगीतकार एम.एम.कीरवानी, काल भैरव आणि राहुल सिप्लिगुंज ने केलेली आहे.

”सर्वोत्तम मूळ गाणे” या गटात नातू-नातू सोबत अजून बऱ्याच दिग्गजांची गाणी देखील होते. टेलर स्विफ्टचे ”कॅरोलिना”, ”ciao papa ”, ”होल्ड माय हॅन्ड”(टॉप गन:मावरीक),”लिफ्ट मी अप” (ब्लॅक पॅन्थर:वाकांडा फॉरेव्हर) या गाण्यांना मागे टाकत RRR या सिनेमातील नातू-नातू या गाण्याने पुरस्कार प्राप्त केला.

एम.एम.कीरवानी यांनी त्यांच्या पत्नीसह हा पुरस्कार स्वीकारला. आभार भाषणात त्यांनी अभिनेता राम चरण आणि जूनियर एन.टी.आरचा विशेष उल्लेख केला.

“या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी तुमचे खूप खूप आभार: “हा पुरस्कार एस.एस.राजामौली यांना त्यांची दूरदृष्टी, माझ्या कामावरील निरंतर विश्वास आणि पाठिंबा यासाठी जातो. तसेच एन.टी. रामाराव आणि राम चरण यांच्या जोशपूर्ण नृत्यासाठी विशेष आभार.

या आनंदाच्या क्षणी सिनेविश्वातील इतर सहकारी कलाकारांनी सुद्धा त्यांचा प्रतिसाद दिला. “अतुलनीय .. पॅराडाइम शिफ्ट सर्व भारतीयांकडून आणि तुमच्या चाहत्यांकडून कीरावणी गरूचे अभिनंदन! राजामौली गारु आणि संपूर्ण RRR टीमचे अभिनंदन!” असे ‘ए.आर.रहमान’ यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. ए.आर.रहमान यांनी भारताला पहिला गोल्डन ग्लोब अवॉर्ड ‘स्लमडॉग मिलेनियर (२००९)’ चित्रपटासाठी ”सर्वोत्कृष्ट स्कोअर” श्रेणीमध्ये मिळून दिला होता.

एस.एस.राजामौलीचा “बाहुबली द बिगिनिंग”, ”बाहुबली:द कॉन्क्ल्युजन (२०१७)” या नंतर आलेला आर.आर.आर हा तिसरा सिनेमा जगभरात हिंदी,तेलगू,तामिळ आणि मल्याळम मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक काल्पनिक चित्रपट आहे. अभिनेते राम चरण आणि जूनियर एन.टी.आर,ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढलेल्या दोन क्रांतिकारकांच्या – अल्लुरी सीतारामराजू आणि कोमाराम भीम यांच्या भूमिकेत दिसले होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *