राज ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; म्हणाले…

मुंबई: राज्यात कोरोनाचां संसर्ग वाढत आहे. या परिस्थिती बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यातून त्यांनी महाराष्ट्राला स्वतंत्र लस खरेदीची मागणी केली आहे.
राज्यात लसीचा तुटवडा जाणवत आहेत. गेल्या आठवड्यात लसी अभावी अनेक केंद्र बंद ठेवावी लागली होती. यावर राज ठाकरे यांनी पंतप्रधान यांचे लक्ष वेधले. तसेच अजुन काही मागण्या केल्या.
कोरोनाची साथ आल्या पासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रातील होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात आकड्या मध्ये मोजल्यास. सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू राज्यात झाले आहे. देश कोरोनाच्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी दरवेळी निर्बंध, लॉकडाऊन लावणे महाराष्ट्राला परवडणारे नाही.
कोरोनाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. म्हणूनच राज्यातील सर्व वयोगटातील सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करावे. हे साध्य करण्यासाठी कमी कालावधीत आवश्यक लसी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी आहे. अस आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांच्या प्रमुख मागण्या
- महाराष्ट्राला स्वतंत्र पणे लस खरेदी करू द्या
- राज्यातील खासगी संस्थांनाही लस खरेदी करता याव्यात
- सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, व योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी