राहुल गांधीचे मच्छीमारांसोबत समुद्रात पोहतांनाचे फोटो व्हायरल
कॉंग्रेस नेते राहुल गांधी सद्या केरळ दौऱ्यावर
केरळ: कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यानी कोल्लम जिह्यात मच्छीमारांसोबत समुद्रात उतरून मासेमारी केली. राहुल गांधी हे समुद्रात पोहत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
सद्या राहुल गांधी हे केरळ दौऱ्यावर आहे. यंदा केरळ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी राहुल गांधी विविध भागांचे दौरे करत आहेत. बुधवारी यावेळी ते केरळ मधील कोल्लम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथे राहुल गांधी मच्छीमारांसोबत समुद्रात गेले होते. यावेळी ते मासे पकडताना दिसून आले.
यावेळी त्यांनी मासेमारी करणाऱ्यांन सोबत संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, ज्या प्रमाणे शेतकरी जमिनीवर शेती करतात त्याच प्रकारे मच्छीमार समुद्रात काम करत असतात. केंद्र सरकार मध्ये शेतकऱ्यांसाठी वेगळे मंत्रालय आहे. मात्र मच्छीमारांन बद्दल प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालय नाही. यापूर्वी त्यांनी पुद्दुचेरी येथील मच्छीमारांसोबत संवाद साधला होता. या वर्षभरात ५ राज्याच्या विधानसभा निवणुका होणार आहे. केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जूनला संपुष्टात येणार आहे. या अनुषंगाने राहुल गांधी त्या त्या राज्याचे दौरे करत आहेत.