Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचाभाजप पदाधिकाऱ्याचा चंद्रकांत पाटलांना सवाल; पक्ष बीओटी वर चालवायला दिला आहे का?...

भाजप पदाधिकाऱ्याचा चंद्रकांत पाटलांना सवाल; पक्ष बीओटी वर चालवायला दिला आहे का? अशी विचारणा

पंढरपूर: पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे दिवगंत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. मतदारसंघात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित केली. या तगड्या स्पर्धेमुळे आत सगळ्यांचंच लक्ष पंढरपूर पोटनिवडणुकीकडे लागलेलं आहे. या सगळ्याबाबतीत भाजपच्या कार्यकर्त्यांमधून मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. मतदारसंघात भाजपचे आता जुने आणि नवे कार्यकर्ते असा वाद निर्माण होऊ लागला आहे.

भाजपची यंत्रणा विस्कळित आहे अवताडे आणि परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेळ बसलेला नाही. अनेक गावांत अजूनही अवताडे यांची यंत्रणा कामाला लागली नाही. प्रचाराचा नारळ फोडला असला तरीही कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसत नाही. हे कमी म्हणून की काय गेल्या दोन दिवसांत जुने आणि नवे कार्यकर्ते असा वाद रंगला आहे. पक्षाचा झेंडा प्रतिकूल परिस्थितीत फडकवत ठेवणारे ज्येष्ठ जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते या प्रचारापासून दूर आहेत त्यांना साधी विचारणा ही झालेली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे.

याच संतापाच्या भरात ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मेसेज पाठवून ” पक्ष बीओटी वर चालवायला दिला आहे काय?” असा सवाल विचारला आहे. यावरून निष्ठावान आणि ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांमध्ये किती तीव्र नाराजी पसरली आहे याची कल्पना येते. मंगळवेढा येथे ही भाजपच्या कार्यकर्त्यां मध्ये धुसफूस आहे. बुधवारी अवताडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत दोन कार्यकर्ते चपला घेऊन एकमेकांच्या अंगावर धावल्याचे दिसून आले.

यावेळी आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उमेदवार समाधान अवताडे उपस्थित होते. तरीही या बैठकीत पदावरून कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. या प्रकरणाची मंगळवेढ्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो. इथं कार्यकर्ते पक्षाचा आदेश मानून काम करतात ही परंपरा सांगितली जाते मात्र, पंढरपूर, मंगळवेढा भाजपमध्ये धुसफूस वाढीला लागली असल्याने अनेक पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त आहेत असं दिसून येतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments