|

पुण्याचं उपमहापौरपद पुन्हा एकदा आरपीआयला…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

 पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणूका आता जेमतेम एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. महापालिकेच्या विषय समितींच्या सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती या समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखड्यामुळे शहर सुधारणा समितीवर नियुक्तीसाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ आहे. या वेळी वेगळ्या चेहऱ्याला संधी देऊन आश्चर्याचा धक्का देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.

सभागृह नेते धीरज घाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला त्याचवेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, शेंडगे यांचा राजीनामा त्या वेळी घेण्यात आला नव्हता. महापालिकेच्या पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याने ‘आरपीआय’ला उपमहापौर पद देण्यात येणार असल्याचं आधीच स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे शेंडगे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपवरही दबाब होता.

अखेर चर्चांना पूर्णविराम लागलाय, महापौरपदी पुण्याच्या आरपीआयच्या नगरसेविका आणि विद्यमान गटनेत्या सुनिता वाडेकर यांची निवड निश्चित झाली आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. आरपीआयच्या अंतर्गत बैठकीत वाडेकर यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता उपमहापौर पदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे.

‘पीएमपी’चे संचालक शंकर पवार यांच्याकडेही राजीनाम्याची मागणी करण्यात आली असली, तरी त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे समजते. शेंडगे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपवरही दबाव होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *