Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचापुणेकर संतप्त ! संचारबंदीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या.

पुणेकर संतप्त ! संचारबंदीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या.

पुणे : राज्यभरात अनेक ठिकाणी रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या बातम्या गेले काही दिवस समोर येत होत्या. कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडिसिव्हरचे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पुण्यात रेमडिसिव्हर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. मात्र याविरोधात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेमडिसिव्हीर मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले असून याठिकाणी एकच गोंधळ उडाला आहे. राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू झाली आहे, असे असूनही हे सर्व कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मार्गावर एकत्र आले आहेत. या नातेवाईकांनी रास्तारोको करण्याचाही प्रयत्न केला.
रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने सामान्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णांच्या या नातेवाईकांनी पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयाबाबतही हिच समस्या मांडली आहे, त्यांनी असे म्हटले आहे की गेले तीन दिवस ससूनमध्ये रेमडिसिव्हीर उपलब्ध नाही आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ही संचारबंदी १४ एप्रिल २०२१ रात्रीपासून सुरू झाली आहे. अशावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे, मात्र रेमडिसिव्हीरचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्स उपलब्ध नसणे इ. सर्व समस्यांमुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments