पुणे – विकेंड लॉकडाऊन सुरू; वाचा काय सुरू, काय बंद राहणार

पुणे: पुण्यात आज सायंकाळी ६ पासून कडक लॉकडाऊन राबवण्यात येत आहे. विकेंड लॉकडाऊनची पुण्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शुक्रवारी ६ पासून ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र या दरम्यान दूध आणि मेडिकल सुविधा सुरू राहणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय आणि अति तातडीच्या कारणास्तव बाहेर पडता येणार आहे. कोणत्याही कारणास्तव बाहेर पडल्यास पोलिसांकडून खातरजमा होणार आहे, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश दिलेले आहेत.
दरम्यान पुण्यातील स्थानिक व्यापाऱ्यांनी कडक निर्बंधांना ना पसंती दाखवली होती. यासाठी पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर येऊन आंदोलन केलं होतं, काहींनी फलकबाजीही केली आहे. आमचे आर्थिक नुकसान होत असल्याचं कारण व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं, तसेच आज काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला विकण्याचं आंदोलन सुद्धा दुकानासमोर येऊन केलं. यातदेखील मोठ्या प्रमाणात फलकबाजी देखील झाली होती.
पुण्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लावणे अनिवार्य असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं, मात्र आता अखेर पुण्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद ?
- विकेंड लॉकडाऊन मध्ये दूध केंद्र (सकाळी ६ ते सकाळी ११) सुरू राहील
- वैद्यकीय सुविधा सुरू राहणार
- भाजीपाला दुकान / मंडई बंद
- हॉटेल, बार, रेस्टॉरंट मधून घरपोच पार्सल सेवा मिळणार
- स्विगी आणि झोमॅटो यांच्यामार्फत पार्सल सेवा सुरू राहील
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मद्य विक्रीचे दुकान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे घरपोच सेवा देणार
- घरेलू कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, जेष्ट नागरीक, वैद्यकीय मदतनीस यांना सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत प्रवास करता येईल
- स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मेस मधून सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल घेता येणार
- PMPL सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
- अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार
- कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणात सोबत बाळगावे लागणार
- कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरू राहणार