‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांना पुणे महापालिका देणार ५ हजार अर्थसाह्य

पुणे: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करण्याच्या हेतूने पुणे महापालिकेच्या अर्थसहाय्य करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या शंभर उमेदवारांना महापालिका अर्थसाह्य करणार आहे. या विद्यार्थांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला.
‘पुणे महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने पुस्तके खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य द्यावे. असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.’ अशी माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रसाने यांनी दिली.
‘यासठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात समाज विकास विभागाकडे युवक कल्याणकारी योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे अर्थसाह्य थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) माध्यमातून दिले जाणार आहे असे स्पष्टीकरण सुद्धा हेमंत रासने यांनी दिले.