पुणे महापालिका उद्यापासूनच्या कडक लॉकडाऊन साठी सज्ज

pune lockdown
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: पुण्यात कोरोनाच्या उद्रेकामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य व्यवस्था ढासळत चालल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र संपूर्ण यंत्रणा परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्याची माहिती पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बेडची गरज वाढली. पण आवश्यकतेनुसार वाढ करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात गेल्या दोन दिवसांत व्हेंटिलिटेरचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितलं की, पुण्यात एकूण ५५० व्हेंटिलेटर बेड पैकी फक्त २ शिल्लक होते. मात्र, आर्मीकडून २० व्हेंटिलेटर बेड आणि २० आयसीयू बेड मिळणार असून पुढील चार दिवसांत ५० व्हेंटिलेटर बेड वाढवणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. ऑक्सिजन बेडचा विचार करता पुण्यात ४०० ऑक्सिजन बेड शिल्लक असून त्यात आणखी ३५० ऑक्सिजन बेड वाढवत असल्याचंही आयुक्त यावेळी म्हणाले.
पुण्यात कोरोनाची दुसरी लाट कधी आणि कशी सुरू झाली, याचा आढावा या पत्रकार परिषदेत घेण्यात आला.

पुण्याची आजची स्थिती:

ॲक्टिव्ह रुग्ण – ४६००० रुग्ण

त्यापैकी गंभीर लक्षणं नसलेले ३९०००

रुग्णालयात दाखल – ६६५०
त्यापैकी व्हेंटिलेटरवर ५५० व्हेंटिलेटर आणि उरलेले ऑक्सिजनवर

बेड वाढवणे सुरूच;

६ खासगी रुग्णालयं १०० टक्के कोरोनासाठी पुण्यात खासगी, शासकीय आणि महापालिकेचे हॉस्पिटल असे एकूण ३५०० बेड होते. हा आकडा १६ दिवसांत ७५०० पर्यंत वाढवला असल्याचं त्यांनी सांगितलं. व्हेंटिलेटर बेडचा आकडाही २९० वरून ५५० वर गेल्याचं ते म्हणाले. पुण्यातली स्थिती पाहता बुधवारी ६ खासगी रुग्णालयांना १०० टक्के कोरोना रुग्णालय घोषित करण्यात आलं. तसंच बिबेवडीत १२० बेडचं ईएसआय हॉस्पिटल दोन दिवसांत कोरोनासाठी सुरू करणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं.
पुण्यात फेब्रुवारीच्या मध्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. सध्या पुण्यात ४६००० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी ३९००० हजार रुग्णांना काहीही त्रास नाही. हे रुग्ण घरी किंवा विलगीकरणात आहेत. तर ६६५० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

लसीकरण वाढवणार..
कोरोनाचा सामना करताना लसीकरण अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं ज्याठिकाणी ४५ पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील त्याठिकाणी जाऊन लसीकरण करण्याची योजना राबवणार असल्याचं आयुक्त म्हणाले. मनपाकडे २५ हजार लस डोस शिल्लक असून रोज २२ हजार लोकांना लसीकरण केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेला एकूण ५,९७,००० डोस मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा प्रशासन कठोर पावलं उचलत आहे. कोविड नियमावलीनुसार अंमलबजावणीसाठी कारवाई केली जात आहे. ३ लाख २२ हजार लोकांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई करत १५ कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला, असून ठिकठिकाणी तपासणी केली जात असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. शुक्रवारी संध्याकाळपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात होत असून पोलिसांना कारवाईचे अधिकार दिल्याची माहितीही त्यांनी दिली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *