Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचापुणे शहर आता देशातील हॉटस्पॉट!

पुणे शहर आता देशातील हॉटस्पॉट!

पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कठोर निर्बंधाची घोषणा काल करण्यात आलीय. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली. पुणे शहर आता राज्यातीलच नव्हे तर देशातील हॉटस्पॉट बनत आहे. रोजचे दहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात आढळून येतायत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात बेड्सची कमतरता भासायला सुरुवात झालीये. त्यामुळे आता लसीकरणावर भर द्यावा लागणार आहे.एकीकडे पुणे शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाहीये तर दुसरीकडे जिल्ह्यात आता समूह संसर्ग सुरू होण्याची भीती व्यक्त केली.

काल दिवसभरात पुण्यात नवे ६ हजार २२५ कोरोनाचे नवीन आढळून आले आहेत, ही दिवसभरातली उच्चांकी पाझिटिव्ह रुग्णांची वाढ असल्याचं म्हटलं जातंय. काल कोरोनाबाधीत ४१ रुग्णांचा मृत्यू झालाय तर त्यातील ११ रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. ३७६२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून ९०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल दिवसभरातील (४ एप्रिल ) पुण्यातील एकूण आकडेवारी खालीलप्रमाणे –

४ एप्रिल – रविवार

  • दिवसभरात उच्चांकी ६,२२५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३,७६२ रुग्णांना डिस्चार्ज.
  • कोरोनाबाधीत ४१ रुग्णांचा मृत्यू. ११ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २,९०,०४४
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४१,९४०
  • एकूण मृत्यू – ५,४५२

-कालपर्यंत एकूण डिस्चार्ज – २,४२,६५२

  • काल केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७,७७४

प्रशासनाकडून शर्थीने प्रयत्न सुरु
कोरोना वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणावर प्रशासनाने भर दिलाय. यासाठी जिल्ह्यात २ एप्रिलपासून मिशन १०० डेज ही खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रोज किमान १ लाख डोस दिले जाणार आहेत. याशिवाय येत्या सोमवारी म्हणजेच ५ एप्रिलपासून १ लाख १० हजार डोस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. दिल्या जाणाऱ्या या एकूण डोसपैकी सर्वाधिक ४५ हजार डोस हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, त्यापाठोपाठ ३५ हजार डोस पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ३० हजार डोस पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आलेत. शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. त्यामुळे आता लसीकरण आणि कडक निर्बंध हाच त्यावर उपाय आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments