|

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

Pune District Information Officer Rajendra Sarg passed away in Corona
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्याचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरग यांच्या प्रकृतीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे माहिती खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरग यांचा माध्यम क्षेत्राशी मोठा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. पंधरा दिवसात त्यांना प्रमोशन मिळणार होते. पण तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले.
सरग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अनेकवेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोनापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरग यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *