बाथरूममधून बाहेर काढले म्हणून असा पक्ष काढला ज्याने इंदिरा गांधींनासुद्धा आव्हान दिले.

नंदमुरी तारक रामाराव हे तेलुगु चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलावंत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांची गणना तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होते. त्यांनी २०० पेक्षाही अधिक तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी तेलुगु देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली.
ही ९० च्या दशकातील सुरुवातीच्या दिवसाची घटना आहे. त्यादरम्यान, नंदमूरी तारक रामाराव म्हणजेच एन टी रामाराव (NTR) नेल्लोर च्या दौऱ्यावर होते. नेल्लोर आंध्र प्रदेश चे छोटे शहर आहे आणि त्या काळात छोट्या शहरांत चांगल्या हॉटेल्सची कमतरता होती. त्यामुळे रामाराव यांनी सरकारी सर्किट हाऊस गाठले. परंतु जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना कळले की, तेथील साऱ्या खोल्या बुक आहेत. केवळ एक खोली उपलब्ध आहे. परंतु ती देखील आंध्रप्रदेश सरकारच्या एका मंत्र्याच्या नावे राखीव आहे.
परंतु रामाराव यांच्या प्रसिद्धी आणि स्टारडम पाहता तेथील केअर टेकरने थोडं घाबरूनच त्यांना मंत्रीजी येण्याआधी पर्यंत खोली देऊ केली. खोलीत गेल्यावर रामाराव अंघोळीसाठी बाथरूम मधे निघून गेले. तेवढ्यात नेमके मंत्रीजी तेथे येऊन उभे राहिले व आपली खोली दुसऱ्याला दिल्याबद्दल केअर टेकरची खरडपट्टी करू लागले याचा परिणाम म्हणजे रामाराव यांना खोली खाली करावी लागली.
या घटनेने रामाराव यांना अपमानित व्हावं लागलं. हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. याच्या काही दिवसातच रामाराव चेन्नईला गेले. तेथे त्यांनी त्यांचे मित्र नागी रेड्डी यांना झालेला प्रसंग सांगितला. त्यावर नागी रेड्डी म्हटले, “भले तू कितीही संपत्ती आणि प्रसिद्धी मिळव परंतु खरी पॉवर तर राजकीय नेत्यांकडे असते.” हे ऐकून रामाराव यांनी पक्के केले की, आपल्यालाही आता राजकीय पक्ष निर्माण करून स्वतःचं राजकीय वर्चस्व निर्माण करायचं आहे. आणि ही घटना त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कारणीभूत ठरली.
राजकारणात दमदार पदार्पण केले –
हे १९८२ साल होते, जेव्हा राजीव गांधी काँग्रेस पार्टीचे महासचिव होते व टी अंजैया आंध्र प्रदेशचे काँग्रेसी मुख्यमंत्री होते. एक दिवस राजीव गांधी आपल्या पार्टीच्या कामानिमित्त हैदाराबाद पोहचले. त्यांना पाहण्यासाठी बेगमपेट विमानतळावर बरीच गर्दी जमा झाली. विमानतळावर राजीव गांधींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री टी अंजैय्या देखील पोहचले. विमानतळावर झालेल्या गर्दीच्या गैरव्यवस्थपणामुळे राजीव गांधी बरेच रागावले. पुढच्या दिवशी आंध्रपदेशच्या सर्व वृत्तपत्रांमधे याबद्दल बातम्या प्रकाशित झाल्या.
एन. टी. रामाराव यांनी याच गोष्टीचा फायदा घेत राजीव गांधी यांनी टी अंजैया यांचा केलेला अपमान म्हणजे सर्व आंध्र प्रदेशच्या लोकांचा अपमान असं भासवून रामराव यांनी आपल्या तेलगू देसम या नवीन पक्षाची घोषणा केली. या सोबतच काँग्रेसला धडा शिकवण्याचं लोकांना आवाहन केलं. सोबतच ते म्हटले की, “माझं वय जवळपास ६० आहे. २०० पेक्षा जास्त चित्रपटमध्ये मी काम केलं; परंतु आता लोकांची सेवा करण्याची मला इच्छा आहे.”
९ महिन्यानंतर झालेल्या आंध्रच्या विधानसभा निवडणुकाच्या निकालात याचा परिणाम दिसून आला. त्यांना तेव्हा दोन तृतीअंश मत प्राप्त झाले. पक्ष स्थापनेच्या ९ महिन्यात दोन तृतीअंश मते त्याकाळच्या राजकारणात असा पहिला प्रसंग होता. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत साऱ्या वृत्तपत्रामध्ये याविषयी छापून येऊ लागले. तामिळनाडूच्या राजकारणाप्रमाणे आंध्रप्रदेशचे राजकारण देखील चित्रपट तारे, तारका यांनी प्रभावित होऊ लागले. रामाराव सरकार स्थापने नंतर आपली लोकप्रियता सरकार मार्फत अधिकाधिक वाढवू लागले. २ रुपये किलो तांदूळ, विद्यार्थ्यांना मोफत पास, हॉस्टेल्स मधे विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क अशा कितीतरी अजब योजना त्यांनी सुरु केल्या.
एन. टी. रामाराव यांच्यात असे काय होते कि त्यांनी आंध्रच्या जनतेला संमोहित करून सोडले होते?
रामाराव यांचा जन्म १९२३ मधे कृष्णा जिल्ह्याच्या निम्माकुरू गावात झाला. परंतु तेथे चांगले शिक्षण नसल्यामुळे ते विजयवाडा येथे आपल्या मामाकडे शिक्षणासाठी आले. तिथेच त्यांनी ग्रेज्युएशन केले. नंतर मद्रास सिविल सेवाची परीक्षा पास केली. काही दिवस त्यांनी सब रजिस्ट्रार म्हणून काम केले. परंतु त्यांचे मन त्या कामात रमले नाही. नंतर त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले.
१९४९ मधे त्यांचा पहिला “मना देसम” चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. याच्या काही दिवसात ते इंग्रजी नाटक पिजारो वर आधारित पल्लेतोरी पिल्ला मधे लीड ऍक्टर होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि यांनतर त्यांचे नशीब उघडले. यानंतर तेलगू चित्रपट सृष्टीत त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले. तमिळ फिल्म इंडस्ट्री प्रमाणे तेलगू चित्रपट सृष्टीत देखील अभिनेत्यांना पूजले जाऊ लागले. लोकांच्या मनावर हे स्टार्स गारुड करू लागले. ज्या प्रमाणे एम जी रामचंद्रण यांनी लोकप्रियता मिळवली त्याचप्रमाने एन. टी. आर यांनी देखील तशीच लोकप्रियता मिळवली. रामाराव यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या फिल्मी करियर मधे त्यांनी हिंदू देव देवता यांचे रोल केले.
एन. टी. आर यांचे सरकार बरखास्त आणि हातात मनी बॅग असे इंदिरा गांधी यांचे माँ कालिच्या रूपातील कार्टून-
हृदय शस्त्रक्रियेसाठी एन. टी. आर अमेरिकेला गेले असताना त्यांच्या पश्चात आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसमच्या एका बंडखोर आमदाराने ९९ आमदारांसह काँग्रेस सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. रामाराव यांना फ्लोर टेस्टची संधी न देता राज्यपालांनी हे सरकार स्थापले होते. या घटनेचा पडसाद म्हणजे ब्रिटनच्या इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्राने माँ कालीच्या रूपातील एक इंदिरा गांधींचे कार्टून छापले ज्यात एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात मनी बॅग दाखवले होते.
या घटनेने विरोधक संतापले हे प्रकरण बरंच उचलून धरण्यात आले. संसदेत यावर प्रश्न विचारला गेला तेव्हा इंदिरा गांधींना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले की, “केंद्राचा यात काहीच हस्तक्षेप नसून राज्यपाला मार्फत हे सरकार बरखास्त झाले आहे.” यानंतर काही आठवडे वाद सुरु राहिला. परिस्थिती लक्षात घेऊन स्वच्छ प्रतिमेच्या डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. प्रकरण इतक्याने शांत झाले नाही. जेव्हा बंडखोर आमदार रामलाल बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तेव्हा १९८४ ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एन. टी. रामाराव यांचे सरकार बसले.
रामाराव यांच्या राजकीय जीवनाबरोबरच त्यांचे खाजगी जीवन देखील चर्चेत राहीले. रामाराव यांचे पाहिले लग्न ४० दशकामध्ये त्यांच्या मामाच्या मुलीशी झाले होते. नंतर ८० च्या दशकात पहिल्या पत्नीचा देहांत झाला. पहिल्या पत्नीकडून त्यांना १२ मुले झाले. नंतर १९९३ मधे त्यांनी ३३ वर्षीय तेलगू लेखिका लक्ष्मी शिव पार्वती सोबत लग्न झाले. संपूर्ण परिवार त्यांच्या विरोधात होता परंतु त्यांनी कुणाचेच ऐकले नाही व १९९३ मधे दुसरे लग्न केले.
१९९४ मधे विधानसभेची निवडणूक झाली ज्यात तेलगू देसमला बहुमत प्राप्त झाले. एन. टी. रामाराव पुन्हा एकदा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपले जावई चंद्रबाबू नायडू यांना देखील मंत्री बनवले. त्यांना वित्त मंत्री बनवले गेले. त्यावेळी ते नंबर २ चे मंत्री होते. परंतु त्यावेळी सरकार वर रामाराव यांची दुसरी पत्नी लक्ष्मी यांची पकड होती. जी तेलगू देसमच्या काही मंत्री आमदारांना खटकत होती. याचाच फायदा घेऊन पार्टी मधे विद्रोह झाला आणि या विद्रोहचे कारण होते रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू. नायडू यांनी दीडशे आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. तेलगू देसम मधील त्यावेळी नायडू गट आणि रामाराव गट असे दोन गट पडले होते. चंद्राबाबू नायडू यांना धोकेबाज, विश्वासघातकी असे सारे विशेषणे रामाराव यांनी दिले आणि पार्टीला पुन्हा संघटित करू लागले. परंतु सत्ता गमावल्यानंतर ५ महिन्यातच रामाराव यांचे हार्ट अटॅकने देहांत झाला.